आईच एक स्वप्न...

प्रतिक कांबळे
Wednesday, 27 February 2019

भारत हा एक विकसित झालेला देश आहे. भारतातील एकूण लोकसंख्या बघता त्या लोकसंख्येचा निम्याहून ही कमी लोकसंख्या आपल्या भारत देशाचे संरक्षण करण्यासाठी सैन्यात भरती होतो.

भारत हा एक विकसित झालेला देश आहे. भारतातील एकूण लोकसंख्या बघता त्या लोकसंख्येचा निम्याहून ही कमी लोकसंख्या आपल्या भारत देशाचे संरक्षण करण्यासाठी सैन्यात भरती होतो. आणि इतकी मोठी लोकसंख्या असलेला आपल्या भारतातील अर्धावरून जास्त लोकसंख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपले करतात.परंतु आज आपणास हीच खंत वाटते की देशासाठी एक जवान शहीद होतो तर त्याच्या जागी आणखी कोणच उभा राहण्यास तयार होत नाही आणि महत्त्वाचे तर *सैनिक जन्मावा पण तो आपल्या घरात नाही शेजारी*

एक आई तिच्या पोटच्या गोळ्याला विचारते
आई - बाळा तु मोठा होऊन काय होणार? 
मुलगा - आई ! मी ना मोठा होऊन डॉक्टर, इंजिनिअर होणार
आई - का रे ! डॉक्टर, इंजिनिअर का रे?
मुलगा - कारण की डॉक्टर लोकांचे प्राण वाचवतो आणि इंजिनिअर नवनवीन संशोधन करतो
आई - अरे वा तुला तर सगळ माहिती आहे पण मी म्हणते तु आपल्या भारत देशाचा सैनिक का होत नाही आणि भारत देशाचे रक्षण का करीत नाही
मुलगा - नको गं आई ते सैनिक दिवसरात्र थंडी गारठ्यात, उन्हाळी, पावसाळी नुसते हातात बंदूक घेऊन लढत राहतात
आई- मग काय झाले ते दहशतवादी हल्ल्यातून आपल्या देशाला वाचवता तसे तु ही वाचव की 
मुलगा - नको नको गं आई नको मला सैनिकांची नोकरी, मी टिव्ही मध्ये बऱ्याच वेळा बघितले आहे त्यांना बरोबर अन्न मिळत नाही, बरोबर सुविधा मिळत नाही 
आई - बर ! ठिक आहे
मुलगा - आणि हो काल झालेल्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ला त्यात तर आपले ४४ सैनिक शहीद झाले तसे मला व्हायचे नाही गं
आई - बर बर 

म्हणजे बघा जरी आपल्या घरात नाही जन्माला सैनिक शेजारी तरी जन्माला ना तरी तो म्हणतो की नको ती सैनिकांची ड्युटी उन्हाळी, पावसाळी, हिवाळी देशाचे रक्षण करायला नको फक्त पाहिजे ऐशो आरामात जिंदगी आणि ऐसीची थंडगार हवा.फक्त टिव्ही वर बातमी आली *दहशतवादी हल्यात भारतीय जवान शहीद* तेव्हाच आपल्या भारतीय माणूस जागा होणार अन् सोशल साईडवर जवानांना श्रध्दांजली म्हणून फोटो ठेवणार डिपी वर, एखादे पोस्टर बनवून त्यांच्या नावाने *भारत के वीर जवान अमर रहें!* म्हणून पोस्ट करणार आणि जागोजागी ,गल्लोगल्ली हल्लाबोल करीत बंद करणार अन् एक दिवशीच त्या वीर जवानांना श्रध्दांजली म्हणून मेणबत्ती लावणार.मग झाले दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच रुटीन चालू होणार पुन्हा हल्ला झाला की पुन्हा तेच करणार अन् ५-१० रूपयाची मेणबत्ती आणून श्रध्दांजली देणार आणि जोरदार नारे बाजी पाकिस्तान मुर्दाबाद इत्यादी.

अरे इतकेच जर सीमेवर लढणाऱ्या जवांनाबद्दल आदर असेल ना जसे आदरपूर्वक एक दिवस बंद करून श्रध्दांजली देता ना तसेच वर्षोचे ३६५ दिवस त्या सीमेवर जाऊन पहारा द्या अन् करा ना सैनिकांची ड्युटी अन् वाचवा आपल्या भारत देशाला दहशतवादी हल्यापासून

पुलवामा दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News