संशोधन संस्थांशी कृषी विद्यापीठाने केला सामंजस्याने करार

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Thursday, 17 October 2019
  • राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. इंदू सावंत, पुष्पविज्ञान अनुसंधान निर्देशनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद व राष्ट्रीय अजैविक ताण संस्थेचे संचालक डॉ. जगदीश राणे उपस्थित होते.

दाभोळ - भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत पुणे-मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुष्पविज्ञान अनुसंधान निर्देशनालय आणि बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण संस्था या भारतातील तीन नामांकित संशोधन संस्था व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार करण्यात आला.

या वेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. इंदू सावंत, पुष्पविज्ञान अनुसंधान निर्देशनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद व राष्ट्रीय अजैविक ताण संस्थेचे संचालक डॉ. जगदीश राणे उपस्थित होते. कोकण कृषी विद्यापीठातर्फे शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या तीनही संशोधन केंद्रांमध्ये उत्कृष्ट संशोधन सुविधा उपलब्ध असल्यामुळे कोकण कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

भविष्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याचे मत कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी व्यक्‍त केले. कोकण कृषी विद्यापीठ आणि भारत व भारताबाहेरील कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या उत्कृष्ट शासकीय व निमशासकीय संशोधन संस्थांसोबत जास्तीत जास्त सामंजस्य करार करून विद्यार्थी व कोकणातील शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे सांगण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News