राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत कृषी पदवीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019
  • राज्याच्या  कृषी विद्यापीठांतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया झाली सुरू झाली

राज्याच्या  कृषी विद्यापीठांतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येणारी ही प्रवेश प्रक्रिया केटीपीएल याद्वारे ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे.

मे. कल्प टेक्नोलॉजी प्रा . लि . ('केटीपीएल')  यांच्यावर सामायिकक प्रवेश प्रक्रिया 'ऑनलाईन पद्धतीने' राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बी . एससी. बी टेक. बी. एफ. एसी  ह्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी साठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या कृषी विद्यापीठ ('यु'  कोटा) व महाराष्ट्र ('एम कोटा") कोट्याकरिता इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर एकच प्रवेश अर्ज दाखल करावा. 

कायमस्वरूपी वीणा अनुदानित महाविद्यालयातील संस्थातरीय कोट्यांतर्गत इच्छुक उमेदवारांनी सुद्धा संकेतस्थळावर प्रवेश अर्ज दाखल करावा. जेणेकरून अशा उमेदवारांचे नाव सर्वसाधारण गुणवत्ता यादीत समाविष्ट होईल. 

यासाठी पुढील संकेत स्थळावर आपण हा फॉर्म भरू शकता : 
 ई मेल : maharashtra.cetcell.gmail.com / mcaer@rediffmail.com 

संकेतस्थळ  : www.mahacet.org  / www.mcaer.org / maha-agriadmission.in     

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News