पुन्हा पाच कोचिंग क्लासेसला नोटीस

रमेश ठाकरे
Friday, 21 June 2019

उपाययोजन न केल्यास होणार इमारती सील 

अकोला - विद्यार्थी घडविण्याचे व्रत घेतल्याचे सांगत त्याच विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या कोचिंग क्लासेस संचालकांवर अग्नीशमन विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला अाहे. शहरातील ५१कोचिंग क्लासेस अाणि १३ वसतीगृह संचालकाना नोटीस बजावून अग्नी सुरक्षा नसलेले कोचिंग क्लासेस सील करण्याची कारवाई करण्यात येत अाहे. यातच गुरुवारी (ता.२०) अग्नीशमन विभागाने पाच कोचिंग क्लासेसच्या संचालकाना नोटीस बजावली अाहे. 
सुरत येथील कोचिंग क्लासच्या आगीच्या प्रकरणानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासमधील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा विषय गांभिर्याने घेत दहा जूनपासून कठोर कारवाई सुरू केली आहे.

यामध्ये कोचिंग क्लासेसच्या इमारती सील केल्या जात असल्याने भीतीपोटी कोचिंग क्लासेस संचालकांची पळापळ होत असल्याचे चित्र दिसून येत अाहे. शहरातील अनेक कोचिंग क्लासेस निव्वळ कमाईच्या मागे लागले असून, विद्यार्थी सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने या क्लासेसची झाडाझडती घेऊन संचालकांना सुरक्षेचे पुरेशे उपाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सूचनेचे पालन न करणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या इमारती सील करण्यात येत अाल्या होत्या. याची धास्ती घेऊन ५१ कोचिंग क्लासेसपैकी नव्वद टक्के कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी अग्नीशमन विभागाकडे अनुपालन अहवाल सादर करून सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करण्यात अाल्याची माहिती देण्यात अाली अाहे. तर सूचना देऊनही उपाय योजना न करणाऱ्या सरस्वती कोचिंग क्लास अाणि युनिक कोचिंग क्लासेस अद्यापही सील असल्याची माहिती अग्नीशमन विभागाने दिली अाहे. 

या कोचिंग क्लासेसची करण्यात अाली तपासणी 
अग्नीशमन विभागाने गुरुवारी (ता.२०) शहरातील नालंदा अकॅडमी, प्राईड एज्यूकेशन अकॅडमी, रेझोनन्स कोचिंग क्लासेस, दायमा कोचिंग क्लासेस, सिद्धी कोचिंग क्लासेसची झडती घेऊन अग्नी सुरक्षेच्या उपाययोजना अाढळून न अाल्याने या कोचिंग क्लासेसच्या संचालकाना नोटीस बजावण्यात अाली. 

अल्टीमेटमनंतर करण्यात अालेल्या कारवाईचे फलित दिसून येत अाहे. बहुतांश कोचिंग क्लासेस अग्नी सुरक्षेच्या योजना उभारत अाहेत. तर ज्यांच्याकडे उपाययोजना नाहीत अशाची तपासणी सुरू अाहे. उर्वरित कोचिंग क्लासेसवर कारवाई सुरूच राहणार अाहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News