लग्नानंतर दीपिका-रणवीर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

कबीर सिंह दिग्दर्शित ‘८३’ चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार असल्याची चर्चा.

कबीर सिंह दिग्दर्शित ‘८३’ चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगत असून, या चर्चेला आता खुद्द दीपिकानेच दुजोरा दिला आहे.

‘८३’ चित्रपटात कपिलदेव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका मी साकारणार आहे.’ असे दीपिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. रणवीर सिंग या चित्रपटात कपिलदेव यांची भूमिका साकारत आहे.

‘माझा पती या चित्रपटात आहे म्हणून मी हा चित्रपट करत आहे असे मुळीच नाही. रणवीरच्या जागी दुसरा एखादा कलाकार असता तरीही मी ही भूमिका केली असती’, असेही दीपिका पुढे म्हणाली.

लग्नानंतर दीपिका-रणवीर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News