शिवसेनेनंतर भाजपचं प्रचारगीतही अवधूत गुप्तेंच्या आवाजात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 October 2019

भाजपने आज संकल्पपत्र अर्थातच विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासोबतच प्रचारगीत ही लाँच  केलं आहे. प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रख्यात गीतकार गुरु ठाकूर यांनी लेखन केलं आहे.

मुंबई : भाजपने आज संकल्पपत्र अर्थातच विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासोबतच प्रचारगीत ही लाँच  केलं आहे. प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गाणं प्रख्यात गीतकार गुरु ठाकूर यांनी लेखन केलं आहे.

‘महायुतीचा एकच निर्धार, पुन्हा आणूया आपलं सरकार’
पुन्हा आणूया महायुती सरकार,
पुन्हा आणूया देवेंद्र सरकार,
पुन्हा आणूया भाजप सरकार

‘पुन्हा आणूया आपलं सरकार’ असे भाजपच्या प्रचारगीताचे बोल आहेत. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांचेही फोटो प्रचारगीतामध्ये दिसत आहेत. अवधूत गुप्तेंनी गायक स्वप्नील बांदोडकरच्या साथीने शिवसेनेचं प्रचारगीतही गायलं होतं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News