संघाच्या संदेशानंतर राजनाथसिंहांचा समित्या मध्ये समावेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • केंद्रीय मंत्रिमंडळात अमित शहा आल्यावर त्यांचा दबदवा प्रचंड वाढल्याचे चित्र

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या अतिशय महत्त्वाच्या आठ समित्यांपैकी केवळ दोन समित्यांमध्ये समावेश झाल्याने नाराज झालेले संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काल (ता. ६) थेट संघाच्या दरबारात गाऱ्हाणे नेले. त्यांची जाणीवपूर्वक उपेक्षा करण्यात येत असल्याचे लक्षात आल्यावर संघाने या वर्तणुकीवर आपला नकाराधिकाराचा (व्हेटो) ‘दंड’ वापरला.

त्यानंतर रात्री उशिरा आणखी सहा समित्यांमध्ये राजनाथसिंह यांचा समावेश केल्याची ‘दुरुस्ती’ केंद्राकडून आली. 

केंद्रीय मंत्रिमंडळात अमित शहा आल्यावर त्यांचा दबदवा प्रचंड वाढल्याचे चित्र आहे. ते केंद्राच्या साऱ्या म्हणजे आठही समित्यांवर आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात राजकीय अनुभवाचा विचार करता सध्या राजनाथसिंह हे सर्वांत ज्येष्ठ नेते आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री बनण्याच्याही आधी राजनाथसिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

काल समित्या जाहीर झाल्यावर त्यांनी संघदरबारी गाऱ्हाणे नेल्यावर व संघाने त्यांची दखल घेतल्यावरही या समितीत त्यांचे, नितीन गडकरींचे किंवा अन्य तिसरे नाव अजिबात सामील केले गेलेले नाही, हेही लक्षणीय आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News