हे वाचल्यानंतर तुम्ही लग्न न करण्याचा विचार बदलला असेल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

पुणे : आजकाल लग्न म्हणले की, तरुणवर्ग दूर पळताना दिसतो. जर तुम्हीही त्यापैकीच एक आहात तर तुमचा विचार आता बदला. नुकत्याच मेडिकल जर्नल हार्टमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे की लग्न केल्याने वाढत्या वयात हृदयासंबंधित आजार तसेच स्ट्रोक येण्याचा धोका कमी होतो.

२० वर्षांपर्यंत हा अभ्यास करण्यात आला. या संशोधनात तब्बल २० लाखाहून अधिक लोकांना सामील करण्यात आले होते. या संशोधनात युरोप, उत्तर अमेरिका, मध्य आणि पूर्व आशियात राहणाऱ्या लोकांचा समावेश करण्यात आला होता. यांचे वय ४२ वर्षांपासून ते ७२ पर्यंत होते. 

या अभ्यासाअंती हे समोर आले आहे की जोडीदारापासून वेगळे राहणारे, घटस्फोटित, विधवा आणि ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांना हृदयासंबंधित आजार होण्याचा धाका ४२ टक्के असतो. याव्यतिरिक्त या व्यक्तींना स्ट्रोक येण्याचा धोका १६ टक्के असतो. 

स्टडी रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांच्यामध्ये ४२ टक्के मृत्यूचा धोका हृदयरोगामुळे होतो. पुरुष आणि महिला दोघांमध्येही हे धोक्याचे प्रमाण सारखे आढळले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News