'भारत' हिट झाल्याने कतरिनाला फायदा, घेतली दीपिकाची जागा

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या सत्ते पे सत्ता  या चित्रपटाच्या रिमेकमध्ये ऋतिक रोशन आणि कतरिना कैफची वर्णी लागली आहे. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या "सत्ते पे सत्ता" या चित्रपटाच्या रिमेकमध्ये ऋतिक रोशन आणि कतरिना कैफची वर्णी लागली आहे. 

सुत्रांच्या माहिती नुसार या चित्रपटात कतरिनाच्या आधी दीपिका पादुकोनची निवड करण्यात आली होती, मात्र दीपिकाला ऋतिक पेक्षा जास्त फी देणं हे चित्रपटाच्या बजेट मध्ये बसत नसल्याने कतरिनाची निवड करण्यात आली. 

या चित्रपटात कटरिनाची एन्ट्री सलमान खान व रोहित शेट्टीच्या मैत्रीमुळे झाल्याचं बोललं जातय. 'बॅंग बॅंग' या सिनेमामध्ये ऋतिक रोशन आणि कॅटरिना कैफ यांनी एकत्र काम केले आहे त्यामुळे या जोडीला घेऊन चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News