पराभवांनंतर भारतीय संघाची क्रमवारीत घसरण

जयेश सावंत (यिनबझ)
Thursday, 25 July 2019

भारतीय फुटबॉल संघाच्या खराब प्रदर्शनामुळे  त्यांनी आपल्या फिफा क्रमवारीवर १०१ वरून १०३ वर उतार व्हावे लागले आहे.

अहमदाबादमधील नुकत्याच संपलेल्या इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये भारतीय फुटबॉल संघाच्या खराब प्रदर्शनामुळे  त्यांनी आपल्या फिफा क्रमवारीवर १०१ वरून १०३ वर उतार व्हावे लागले आहे. भारताने पाच फिफा पॉईंट गमावले त्यात ताजिकिस्तान आणि डीपीआर कोरिया विरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सीरियाविरुद्ध त्यांनी बरोबरी साधली. 

इंटरकॉन्टिनेंटल कपचे अंतिम विजेते डीपीआर कोरिया 118 व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे उपविजेते ताजिकिस्तान 1१9 व्या स्थानावर कब्जा करून एका  स्थानाचा मान पटकावला. दरम्यान, सीरियाने भारतासारख्याच पराभवाचा सामना करत ते दोन स्थान खाली 87 वर गेले.

इंटरकॉन्टिनेंटल कपच्या प्रारंभाआधी भारताचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमाक म्हणाले  होते की, त्यांचा प्राथमिक हेतू स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूला संधी देणे आणि परिणामाचा तात्पुरता विचार न करणे असा होता. नवा कोच मिळाल्यानंतर खेळलेल्या प्रत्येक सामन्यात भारताने गोल केले आहेत, परंतु बचावफाळणीसाठी त्यांच्याकडे भरपूर काम करायचे बाकी आहे.

फिफा विश्वचषक क्वालिफायर्स मधले भारताचे प्रतिस्पर्धी कतार आणि ओमान यांनाही क्रमवारीत नुकसान सोसावे लागत आहे. एएफसी एशियन कप विजेते फिफाच्या क्रमवारीत 6 गुणांसह 69 व्या स्थानावर घसरले तर ओमान केवळ एक स्थान गमावून आता सीरियासोबत 87 व्या स्थानावर घसरला आहे.

दुसरीकडे, अफगाणिस्ताना 149 व्या स्थानावर आहे तर बांगलादेश आता जगातील 182 व्या क्रमांकावर आहे. 5 सप्टेंबरपासून ओमानविरुद्ध भारत फिफा विश्वचषक क्वालिफायर्स मोहिमेची सुरुवात करणार आहे. गुवाहाटीमध्ये हा सामना आयोजित केला जाणार आहे.

फिफा वर्ल्ड कप क्वालिफायर्समध्ये सकारात्मक परिणाम मिळवून भारत आता सर्वोच्च 100 देशांमध्ये परत येऊ शकेल, कारण रैंकिंग गुणांची गणना करताना या सामन्यांचा अधिक विचार केला जातो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News