अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठी पडझड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019
  • सेन्सेक्‍स ३९४ अंशांनी कोसळला
  • निफ्टीमध्येही घसरण

मुंबई : अर्थसंकल्पाने निराशा केल्याने शेअर बाजारात शुक्रवारी मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३९४ अंशांनी कोसळून ३९ हजार ५१३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक १३४ अंशांच्या घसरणीसह ११ हजार ८११ अंशांवर बंद झाला. 

एफएमसीजी आणि बॅंकिंग वगळता सर्वच क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागात आज घसरण झाली. धातू, ऊर्जा, वाहननिर्मिती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर खरेदीचा सर्वाधिक जोर राहिला. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील जनतेकडील समभागांची मर्यादा २५ टक्‍क्‍यांवरून ३५ टक्‍क्‍यांवर नेण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. यामुळे बाजारात रोकड टंचाई होऊ शकते.

कंपन्यांना या नियमांचे पालन करण्यास पुरेसा अवधी द्यावा लागणार आहे; अन्यथा प्रवर्तकांकडून मोठ्या प्रमाणात हिस्साविक्री होण्याची शक्‍यता आहे. यामुळे बाजारात मोठी घसरण होऊ शकते. याचा फटका शेअर बाजाराला बसेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News