15 वर्षांनंतर आई आणि मुलीची भेट

निकिता कोरे
Saturday, 8 June 2019

तुम्ही सर्व विचारात पडला असणार की आज हे नवीन काय आहे? तर आज बार्शी जवळ एक छोटेसे खेडेगाव आहे. 'अरणगाव'  आज येथे एका वृद्धाश्रमाचे उदघाटन होते. ज्या अनिता मॅडमनी मला कार्यक्रमाला बोलवले होते. त्यांनी आज मला फोन करून बोलवलं होत. मी जे थोडंफार प्रमाणात समाजकार्य करते.

तुम्ही सर्व विचारात पडला असणार की आज हे नवीन काय आहे? तर आज बार्शी जवळ एक छोटेसे खेडेगाव आहे. 'अरणगाव'  आज येथे एका वृद्धाश्रमाचे उदघाटन होते. ज्या अनिता मॅडमनी मला कार्यक्रमाला बोलवले होते. त्यांनी आज मला फोन करून बोलवलं होत. मी जे थोडंफार प्रमाणात समाजकार्य करते. त्यावरूनच आमची ओळख होती. पण आम्ही भेटलो आज पहिल्यांदा, त्यांच्या एका कॉल वर मी तिथे पोहचले म्हणून त्यांना खूप आनंद झाला, आणि एक विशेष गोष्ट सांगायची झाली, तर त्यांनी मला विचारलं की पुढे काय प्लॅन आहे. तुझ्या स्वतःची ट्रस्ट आहे, त्या माध्यमातुन तू काय काय करू इच्छिते. 

तेव्हा माझी मैत्रीण पल्लवी जी वरळीला असते. ति मला बोलली होती। की निकिता अजून 10 वर्ष लागली तरी चालतील पण आपण आपल्या ट्रस्ट द्वारे ज्या पण अनाथ मुलांना दत्तक घेऊ त्यांची जबाबदारी या पद्धतीने घ्यायची की ती मूल मोठ्यापनी अमेरिकेत शिकायला गेली पाहिजेत. त्यांना एवढं कॅपेबल बनवायचे की ते स्वतःच्या पायावर एवढे भक्कम पणे उभे राहावे कीं त्यांना त्यांच्या सारख्या किमान 2 मुलांना तरी उभं करता आलं पाहिजे. यावर मॅडम बोलल्या की त्यांची एक मुलगी होती. 15 वर्षांपूर्वी ती त्यांना सोडून गेली. या जगात नाही. पण त्या नेहमी सगळ्यांना सांगत असत की ती अमेरिकेला शिक्षणासाठी गेली आहे. तीच नाव तेजस्विनी पण तुला बघून अस वाटत की माझी तेजस्विनी ती तूच आहेस. तू मला आई म्हणशील का? 15 वर्षांनंतर तू मला भेटली. 

आता तूच माझी तेजस्विनी आहेस, आणि विशेष म्हणजे माझे आणि तेजस्विनी चे जन्मसाल एकच निघाले. आणि महिना ही एकच सप्टेंबर, मी गणपती च्या काळात आणि ती गणपती यायच्या 3 दिवस आधी, खरच खूप मोठा योगायोग आहे. मी स्वतःला खर च खूप नशिबवान आहे, की माझ्या रुपात त्यांना त्यांची मुलगी मिळाली, मी आता अनिता मॅम ला आईच बोलेल. मी त्यांना आई बोलल्यावर त्या मला घट्ट मिठी मारून रडू लागल्या. माझी पप्पी घेऊ लागल्या आणी तेथिल सर्व लोकांना सांगू लागल्या की ही माझी तेजस्विनी आहे. मी निघताना मला 100 रुपये दिले, आणि मी जेवले नाही म्हणून डबा भरून दिला. खरच मी त्यांच्या पोटी जन्म तर नाही घेतला. पण त्याचं खूप प्रेम मला आज भेटलं.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News