फेसबुक मुळे मुलाला वडील भेटले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 10 August 2019

१५ दिवसांपूर्वी ते बाहेर फिरण्यासाठी आले, मात्र घरी परत जाण्याचा रस्ता विसरून गेले. वडील परत न आल्याचे पाहून मुलगा राजेश याने वडिलांचा परिसरात खूप शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत मग अखेर त्यांनी आकुर्डी पोलीस चौकीत वडील हरवल्याची तक्रार दिली.

मनोरंजनासाठी ओळख असलेल्या फेसबुक मुळे  आज एका बाप लेकाची अनोखी भेट झाली.  जसा फेसबुक चा वापर तास परिणाम. अनेक चांगल्या वाईट परिणामासाठी फेसबुक ओळखला जातो. फेसबुकचा वापर योग्य रितीने केल्यास काय घडू शकते याचे उदाहरण  सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दिले आहे. फेसबुकच्या मदतीने वडील मुलाची १५ दिवसांनी भेट झाली आहे.

१५ दिवसांपूर्वी झेकरिया चेरीयन (वय-५०)  हे त्यांच्या मुलाच्या घराबाहेर पडले, मात्र परत घरी जाण्यासाठीचा  रस्ताचं विसरून गेले. आता घरी जायचे कसे अश्या प्रश्नात चिंताग्रस्त असताना चालत चालत पायी १० ते १२ किलोमीटर ते सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात आले, त्यांना कोणीतरी पोलीस ठाण्यात सोडले आणि निघून गेले.
चेरीयन यांच्याकडे विचारपूरस करण्यात आली मात्र त्यांना काहीच सांगता येत नव्हते. ते केवळ मुलाचे नाव सांगत होते. नावाच्या आधारे पोलिसांनी फेसबुक वर मुलाचे नाव शोधून काढले व फोटोद्वारे  संबंधित मुलगा हाच आहे का असे विचारून ओळखण्यास सांगितले. त्यावेळी चेरीयन यांनी त्यांच्या मुलाला ओळखले. सांगवी पोलिसांच्या  चतुराईने अवघ्या दीड तासातच पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन बाप लेकाची भेट करून दिली.

 झेकरीया चेरियन  हे पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथे त्यांच्या मुलासोबत राहत होते. त्यांना नाही मराठी व नाही हिंदी येत होते. १५ दिवसांपूर्वी ते बाहेर फिरण्यासाठी आले, मात्र घरी परत जाण्याचा रस्ता विसरून गेले. वडील परत न आल्याचे पाहून मुलगा राजेश याने वडिलांचा परिसरात खूप शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत मग अखेर त्यांनी आकुर्डी पोलीस चौकीत वडील हरवल्याची तक्रार दिली. स्वतः राजेश वडिलांना शोधण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होता. परंतु वडील सापडत नव्हते.  झेकरीया चेरियन  जेव्हा पोलीस स्टेशनला आले तेव्हा पोलिसांना अगोदर हा व्यक्ती मनोरुग्ण वाटला, मराठी आणि हिंदी व्यवस्थित येत नसल्याने चौकशीसाठी प्रचंड अडचण येत होती. अखेर केरळी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीशी त्यांचं बोलणं करून दिलं. त्यांनतर त्यांनी सविस्तर माहिती दिली.

त्यांनी राजेश हा मुलगा असल्याचे सांगितले. याच माहिती वरून पोलीस कर्मचारी दत्ता नांगरे यांनी फेसबुकवर या नावाचा व्यक्ती आहे का? हे पाहण्यास सुरुवात केली. त्या नंतर अनेक राजेश नावाचे प्रोफाईल आले मग सर्वांचे फोटो दाखवत अखेर मुलाची ओळख पटलं.  फेसबुक पेज पाहिले असता त्यात मुलगा राजेश ने वडील हरवल्याची पोस्ट टाकलेली होती त्यामुळे पोलिसांची देखील खात्री पटली आणि त्यावर दिलेल्या नंबरवर फोन करून राजेश यांना सांगवी पोलीस ठाण्यात बोलवून घेऊन मुलाची आणि वडिलांची भेट घडवून दिली. अक्षरशः मुलाला पाहून वडिलांचा बांध फुटला आणि ते रडू लागले. तब्बल १५ दिवसांनी ते दोघे ही एकमेकांना भेटत होते. फेसबुकच्या मदतीने वडील आणि मुलाची भेट झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News