बारावीनंतर हा सुद्धा उत्कृष्ट पर्याय...

हेमचंद्र शिंदे
Monday, 1 April 2019

विज्ञान व तंत्रज्ञानात वेगाने होत असलेल्या प्रगतीत जागतिक स्तरावर भारताचे स्थान भक्कम करण्यासाठी, बारावीनंतरच हुशार विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे, कमी वयातच त्यांना संशोधनाची संधी देऊन त्यांच्यातील जिज्ञासा, निर्मिती क्षमता वाढविणे व त्याद्वारे नवीन शास्त्रज्ञ तयार करणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवून मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आधिपत्याखाली आयआयएसईआर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च किंवा भारतीय विज्ञान, शिक्षण व संशोधन) संस्थेची स्थापना २००६मध्ये करण्यात आली.

उपलब्ध जागा : २०१८ नुसार भोपाळ, कोलकाता, मोहाली, पुणे, तिरुअनंतपुरम, बेहरमपूर व तिरुपती अशा सात ठिकाणी संस्था असून, एकूण प्रवेश क्षमता सुमारे १ हजार ३२५ आहे.
अभ्यासक्रम : बारावीनंतर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या नंतर बीएस, एमएस (बॅचलर ऑफ सायन्स- मास्टर ऑफ सायन्स) या दोन पदव्या एकाच वेळी प्राप्त होतात.

या ड्यूएल डिग्री कार्यक्रमांतर्गत प्रथम दोन वर्षे मूलभूत विज्ञानातील मुख्य अभ्यासक्रम, तिसऱ्या व चौथ्या वर्षी आवडीनुसार निवडलेल्या एका विषयात स्पेशलायझेशन व पाचव्या या शेवटच्या वर्षी संशोधन प्रस्ताव, असे स्वरूप असते. पीसीबी अथवा पीसीएम अथवा पीसीएमबीसह विद्यार्थी बीएस, एमएस अभ्यासक्रमासाठी पात्र असतो. फक्त आयसर भोपाळमध्ये चार वर्षे कालावधीचा बीएस-इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲण्ड इंजिनिअरिंग सायन्स हा अभ्यासक्रम देखील उपलब्ध असून, त्यासाठी बारावीत गणित विषय आवश्‍यक आहे.

प्रवेशासाठीचे मार्ग : प्रवेशासाठी तीन वेगवेगळे मार्ग असून प्रत्येक चॅनेलमधून विद्यार्थी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतो.
१.    केव्हीपीवाय ः किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना ः यामधून प्रत्येक संस्थेतील २५ टक्के जागा उपलब्ध होतात. 

२.    जॉइंट एन्ट्रन्स एक्‍झाम ः जेईई ॲडव्हान्स्ड ः यातून २५ टक्के जागा उपलब्ध केल्या जातात, मात्र त्यासाठी खुल्या गटासाठी जेईई ॲडव्हान्स्डमध्ये दहा हजारांपर्यंत रॅंक आणि राखीव गटासाठी कॅटॅगरी रॅंक दहा हजारांपर्यंत प्राप्त करणे आवश्‍यक असते. 

३.    एसएसबी ः स्टेट ॲण्ड सेंट्रल बोर्ड चॅनेल ः आयसरच्या प्रत्येक संस्थेतील ५० टक्के जागा केव्हीपीवाय व जेईई ॲडव्हान्स्डमधून भरल्या जातात. त्यापैकी शिल्लक राहिलेल्या व उर्वरित ५० टक्के जागा या बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आयएटी-आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊन त्यामधून भरल्या जातात. मूलभूत विज्ञानात आवड असणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना बारावीनंतर संशोधक, शास्त्रज्ञ बनण्याची संधी आयसरमधून प्राप्त होत असून, उच्च बुद्धिमत्तेचा वापर संशोधन क्षेत्राकडे व्हावा यासाठी प्रवेशानंतर विद्यार्थ्यांना वार्षिक ८० हजार रुपये शिष्यवृत्ती केव्हीपीवाय नियमानुसार व जेईई आणि एसएसबी मधील विद्यार्थ्यांना दिली जाते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News