आफ्रिदी धावला युवराजसिंगच्या आर्थिक मदतीला?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019
  • पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने नुकतेच कलम 370 रद्द करणाऱ्या मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली होती त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली.

नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने नुकतेच कलम 370 रद्द करणाऱ्या मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली होती त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली. मात्र, सध्या भारताचा माजी फलंदाजी युवराजसिंग आणि शाहिद आफ्रिदी यांच्या वेगळेच बाँडिंग पाहायला मिळत आहे. आफ्रिदीने युवराजच्या 'YouWeCan' या संस्थेला आर्थिक मदत केली आहे. 

युवराजने कॅन्सरवर मात करुन परतल्यावर कॅन्सग्रस्त लोकांसाठी 'YouWeCan' या संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेला आफ्रिदीने दहा हजार डॉलरची मदत केली आहे. बुधवारी कॅनडामध्ये आयोजित कार्यक्रमात आफ्रिदीने ही घोषणा केली. 

युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो सध्या कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल टी20 लीगमध्ये सहभागी झाला आहे. त्याच्यासह या लीगमध्ये वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, न्यूझीलंडचा ब्रॅंडन मॅकलम, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी हेही येथे विविध संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News