वायरल सत्य असत्य: अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद रद्द ? वाचा सविस्तर

हर्षल भदाणे पाटील
Monday, 22 July 2019

सोशल मिडीयावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद रद्द करण्यात आल्याचे मेसेज

मुंबई: मराठा आरक्षणाला आव्हान देणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे बार कौन्सीलचे सदस्यपद अपात्र ठरवण्यात आले आहे. मात्र सोशल मिडीयावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद रद्द करण्यात आल्याचे मेसेज प्रचंड वायरल होत आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. यामुळे मराठा समाजाच्या मोठ्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले होते. मुंबई उच्च न्यायालयाबाहेरच त्यांच्यावर हल्लाही  झाला होता. मात्र यात नेमकं किती सत्य आहे हेच जाणुन घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. 

काय आहे नेमकं सत्य ?

 पान एक वरून 

अॅड. गुणरत्न सदावर्ते महाराष्ट्रा-गोवा बार कौन्सिल सदस्य पदा बाबतचे अपात्र (Disqualified ) असल्याचे बैठकीचे दि.11जुलै 2019चे  इतिवृत्त आणि मा.ट्रिब्युनल चे आदेश दि 24जुन 2019 प्रमाणे बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र व गोवा ची निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पुर्ण करणे ईतर बाबत आदेश होता.

 

या मध्ये असे नमुद आहे की, Accordingly, in modification of  the Order dated 24th June 2019 theTribunal today decides that the counting of the votes as mentioned in the aforesaid Order shall now take place on 20th July 2019, आणि पुढे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे बार कौन्सिल चे सदस्य बनने बाबत disqualified आणि पुढे कुठल्याही बार कौन्सिल निवडणूक लढणे किंवा सदस्य होणे बाबत disqualified असल्याच्या सूचना आहेत. 

 

 

सदावर्ते यांचे बार कौन्सीलचे सदस्यपद रद्द

गुणरत्न सदावर्ते यांची डिग्री रद्द- ते अपात्र अशा पसरलेल्या बातम्या पहाता आम्ही मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक आणि सर्वोच्च न्यायालयातील कॅव्हेटयाचीकाकर्ते राजेंद्र दाते पाटील यांच्याशी संवाद साधला . बार कौन्सीलचे आदेश पत्र त्यांच्या कडुन मिळाले. त्यात स्पष्ट पणे नमुद केले की, हा बार कौन्सील च्या अंतर्गत निवडणुकांचा भाग असुन त्यात गुणरत्न सदावर्ते हे सदस्य होण्यास अपात्र (disqualified ) ठरतात म्हणुन बार कौन्सिलने त्यांचे महाराष्ट्र -गोवा बार कौन्सील च्या नियमांची  पूर्तता न  झाल्यामुळे किंवा बार काऊन्सीलच्या ठरलेल्या नियमानुसार ते त्यांच्या अंतर्गत  निवडणुका अपात्र ठरतात म्हणुन त्यांचे सदस्यपद  रद्द करणे बाबतचा हा विषय आहे. यावरून आपल्याला समजतंय की अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद रद्द झाल्याचे वृत्त असत्य असल्याचे समोर आलंय.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News