पीजीसाठी 9 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, सीईटीशिवाय होणार प्रवेश 

अतुल पाटील 
Sunday, 4 August 2019

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 9 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) न दिलेल्या विद्यार्थ्यानाही संबंधित विभागाला अर्ज, कागदपपत्रे दाखल केल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे. 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 9 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) न दिलेल्या विद्यार्थ्यानाही संबंधित विभागाला अर्ज, कागदपपत्रे दाखल केल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे. 

विद्यापीठाचा मुख्य परिसर आणि उस्मानाबाद उपपरिसरातील पीजीसाठी गेल्या महिन्यात सीईटी घेण्यात आली. पदवी अभ्यासक्रमाचे निकाल लावण्यास विलंब झाल्याने प्रवेश प्रक्रिया लांबली होती. तसेच तीन टप्पे होऊनही काही विभागात जागा रिक्त राहिल्या होत्या. या संदर्भात मुदत वाढविण्याची मागणी काही विभागप्रमुख आणि विद्यार्थ्यांनी केली होती. यासंदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी रिक्त जागांवर इच्छुक विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. नव्या बदलानूसार 9 ऑगस्टपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहेत. तर, विभाप्रमुखांनी 10 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील फॉर्म व कागदपत्रासह संबंधित विभागात संपर्क साधण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी केले आहे. 

वाढीव जागा मागूच नयेत 
पीजी, एम.फील अभ्यासक्रमाच्या रिक्‍त जागावर सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. त्यानंतर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करुन रिक्‍त जागावर आरक्षणानुसार प्रवेश द्यावा. क्षमतेपेक्षा जास्त जागेवर प्रवेश देऊ नये. वाढीव जागा, कोटा यासाठी विनंतीही करु नये. रिक्‍त जागा भरण्यासाठी विभागप्रमुख, विभागीय समिती यांनी प्रयत्न करावेत. संबंधितांनी कार्यवाहीचा अहवाल 10 ऑगस्टपर्यंत पीजी विभागाचे उपकुलसचिव यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News