प्रशासन

प्रतिक कांबळे,पवई
Tuesday, 13 August 2019

लिंग पिसाटलेला आरोपी
साला मोकाट फिरतोय
अन् तुमच्या आमच्या देशात
पुन्हा पुन्हा निर्भया सारखा प्रकार घडतोय

जेव्हा सुईची दाभण होते
जेव्हा गोठ्यातील गाय गाभण होते
जेव्हा देशातील प्रत्येक मुलगी अत्याचार पिडित निर्भया होते
तेव्हा कुठे जाऊन आपल्या प्रशासनला जाग येते

लिंग पिसाटलेला आरोपी
साला मोकाट फिरतोय
अन् तुमच्या आमच्या देशात
पुन्हा पुन्हा निर्भया सारखा प्रकार घडतोय

यात देखील जात आडवी येत आहे
जात ही नागमोडी वळण घेत आहे
त्याच नागमोडी वळणाचा आडोसा घेऊन आरोपी जात आहे
अन् तुमच - आमच प्रशासन सार काही डोळे बंद करून पाहत आहे

तुमच्या डोळ्यावर पडलेली झापड
सांगा आता तरी निघेल का?
लिंग पिसाटलेला नराधम आरोपी
सांगा ते तुमच्या शोधात भेटेल का?

सार काही होऊन जाईल
जागच्या जाग्यावर राहून जाईल
पुन्हा काही दिवस उलटले की 
पुन्हा नवीन निर्भया समोर येईल
त्याला तुम्ही तोंड देताल आम्ही ही तोंड देऊ

आम्ही ही निषेध करू, तुम्ही ही काळा दिवस पाळा
पण विषय थंड झाल्यावर सांगा आम्ही कोणाला दोष देऊ
आमच्या आईला, बहिणीला, मुलीला
की आमच्या देशाच्या प्रशासनाला ?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News