आदिवासी तरुण मुलांना शिकावंसं वाटतं पण ते मागे राहतात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019
  • काहींकडे शिकण्यासाठी पैसेही असतात पण त्यांना ते शिक्षण भेटत असूनही घेता येत नाही.
  • ग्रामीण भागात आजही अशी पोर आहेत ज्या वायात त्यांचे हातात पेन धरायचे वय असते त्या वयात त्यांना मोलमजुरी, शेतात जाऊन कामे करायला लागतात.

शिकायची इच्छा सर्वांनाच असते पण परिस्थिती आडवी येते. काहींकडे शिकण्यासाठी पैसेही असतात पण त्यांना ते शिक्षण भेटत असूनही घेता येत नाही. पण ग्रामीण भागात आजही अशी पोर आहेत ज्या वायात त्यांचे हातात पेन धरायचे वय असते त्या वयात त्यांना मोलमजुरी, शेतात जाऊन कामे करायला लागतात.

आदिवासी पाड्यात तर अजूनही मूल शिक्षणापासून वंचित आहेत. मुरबाडच्या माळशेज घाटात डोंगरदर्‍यांत वागदगड नावाचं गाव आहे याच ग्रामपंचायती मध्ये अंबेमाळी नावाचा एक लहानसा आदिवासी पाडा आहे. येथे रामदास खाकर तरुण मुलगा आहे याची शिकायची इच्छा असूनही परिस्तिथी पुढे त्याला हार मानावी लागली.

वेळेत अर्ज न भारत आल्यामुळे त्याची शिकायची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. परिस्थिती मुळे त्याची शिकायची इच्छा मेली असं तो बोलतो. शेतात राबून तसेच दुसऱ्याच शेतात मोलमजुरी करून तो आपल्या आई वडिलांना हातभार लावतो.
 
असे अनेक तरुण या पालघर जिल्यात आहेत ज्यांच्यापुढे परिस्थिती ने हाथ टेकले पालघर तसेच  ठाणे जिल्ह्यासह राज्यातील सर्वच 13 आदिवासी जिल्ह्यांतल्या पाडय़ापाडय़ांत असे अनेक तरुण आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांचा उधर्निर्वाह चालवण्यासाठी ते दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून आपली पोट भरतात.
 
या अंबेमाळी गावात आजही वीज नाही आणि पाणीही नाही. या गावात आता कुठे पोळ टाकण्याचे काम पूर्ण झाले. असे आजही आदिवासी पाडे आहेत जिथे अजूनही वीज नाही पोहचली अनेक पाड्यात आता सोलर बसवण्यात काम पूर्ण झाले बाकीच्या पाड्यात अजूनही अंधार आहे. हल्ली जग आपण म्हणतो खूप फॉरवर्ड झालाय पण अजूनही हे आदिवासी पाडे वीज तसेच इंटरनेट पासून वंचित आहेत.
 
ह्या आदिवासी पाड्यात शिक्षणाची खूप गरज आहे आणि ज्यांची खरंच शिकण्याची इच्छा आहे ते अनाथ आश्रमातल्या शाळेत जाऊन शिक्षण घेतात. आजही शिक्षणापासून आदिवासी वंचित राहतात पण जर हेच शिक्षण जर त्यांना भेटल तर नक्कीच ते या संधीच सोन करून खूप प्रगती करतील. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News