आदित्य ठाकरेंना मंत्रीमंडळात स्थान, मिळू शकते 'हे' मंत्रीपद?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 November 2019

आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही वर्षापासून युवा सेनेच्या माध्यमातून तरूणांचे प्रश्न मांडले आहेत. तसेच ते तडीसही नेण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठाच्या निवडणुका असो वा मुंबईचे नाईट लाइफ असो हे मुद्दे आदित्य ठाकरे यांनी लावून धरले आहेत.

मुंबई : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं समजतंय. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरे यांनी भूषवावे अशी शिवसैनिकांची तसेच आमदारांची इच्छा आहे. तसेच, भाजप सारख्या १०५ आमदारांचा विरोधी पक्ष असताना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणे ही फार मोठी तारेवरची कसरत असणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या डोक्यावर मुख्यमंत्रिपदाचा काटेरी मुकूट उद्धव ठाकरे टाकू इच्छिणार नाही, याची शक्यता अधिक आहे. 

आदित्य ठाकरे यांच्याकडे कुठली जबाबदारी ?

आदित्य ठाकरे युवा सेनेच्या माध्यमातून तरूणांचे प्रश्न मार्गी लावाताना पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे युवा सेनेत चांगलेच सक्रीय झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही वर्षापासून युवा सेनेच्या माध्यमातून तरूणांचे प्रश्न मांडले आहेत. तसेच ते तडीसही नेण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठाच्या निवडणुका असो वा मुंबईचे नाईट लाइफ असो हे मुद्दे आदित्य ठाकरे यांनी लावून धरले आहेत. तसेच त्यांचे खेळाविषयीचे प्रेम विशेषतः फुटबॉल विषयीचे प्रेम सर्वांना माहिती आहे. तसेच तरूणांनी फिटनेस फ्रिक व्हावे म्हणून मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ओपन जिम सारखे उपक्रम राबविले आहेत. तरूणांशी आपल्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणुनच की काय त्यांच्यावर युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय हे देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

अशी चर्चा आहे की, आदित्य ठाकरे यांना कोणतेही मंत्रीपद न देता, विधिमंडळाचे काम कसे चालते, या अनुभव घेण्यासाठी पुढील पाच वर्ष उमेदवारी करण्यास उद्धव ठाकरे सांगू शकतात. त्यामुळे एक आमदार म्हणून आदित्य ठाकरे सर्व काही शिकून पुढील पाच वर्षांनी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरू शकतात अशी शक्यता अधिक आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News