आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 18 October 2019

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात घालणार असल्याचे स्पष्ट केले, तसेच उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची संसदीय कार्यसमिती घेईल, असं स्पष्ट केलं. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी "स्पप्न पाहण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही," असं म्हणत अप्रत्यक्ष टोला हाणला. 

अनेकदा मुख्यमंत्रिपदाबाबत आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा होते. पण याबाबत एका मुलाखतीदरम्यान त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला असून तो कोणी हिरावून घेऊ शकत नसल्याचं म्हटलं. शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहे. त्यामुळे कोण काय बोलेल याचा विचार केला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा युतील बहुमत मिळेल यात कोणतीही शंका नाही. परंतु भाजपाला स्वबळावर बहुमत मिळेल, असा विश्वास यापूर्वी अमित शाह यांनी व्यक्त केला होता. राज्यात शिवसेना भाजपा युती असली तरी मुख्यमंत्री हा भाजपाचाच असेल, असं शाह यांनी स्पष्ट केलं. तसंच उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय देवेंद्र फडणवीस, त्यांची टीम आणि भाजपाची संसदीय कार्यसमिती घेईल असं म्हणत पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील याचे संकेत दिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News