आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत, निलेश राणेंची इच्छा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 October 2019

कणकवली : काँग्रेसमधून भाजपत आलेल्या राणेंनी आज आपला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन केला असताना भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेबाबात राणेंचे चिरंजीव माजी खासदा निलेश राणे यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे. 

निलेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले रोखठोक मत व्यक्त केले. आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढवण्याबाबत आणि मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेल्या उपमुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता आगोदर आदित्यला निवडून तरी येऊ द्या, आदित्य ठाकरे निवडून येऊ नयेत असे मला वाटते, असे निलेश राणे यांनी सांगितले.

येत्या काळात भाजपला कोकणात एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करु असे रोखठोक मत व्यक्त करुन शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तसेच आदित्य ठाकरे हे निवडून येऊ नयेत, असे मला वाटते असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News