आदित्य ठाकरेंचा आज सोलापुरात विद्यार्थ्यांशी संवाद 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा; मोहोळ, माढा, बार्शीलाही भेट 

सोलापूर: शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला बुधवारी (ता. 31) सोलापुरातून सुरवात होत आहे. सकाळी 11 वाजता वालचंद महाविद्यालयात आदित्य संवाद हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 

जनआशीर्वाद यात्रेसाठी आदित्य ठाकरे यांचे बुधवारी सकाळी सोलापुरात आगमन होईल. सकाळी 11 वाजता वालचंद महाविद्यालयात आदित्य संवाद कार्यक्रम होईल. तेथून ते मोहोळला जाणार आहेत. तेथून पुढे माढा येथे ते भेट देतील. 

उस्मानाबादमधील परांडा येथे विजय संकल्प मेळावा होणार आहे. बार्शीतील बीआयटी कॉलेजमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. पांगरी, येडशी मार्गे ते लातूरकडे रवाना होतील. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांचे प्रश्‍न जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत होणार आहे.

मतदारांनी लोकसभा निवडणुकीत युतीला केलेल्या मतदानाबद्दल आभार मानण्यासाठी व ज्या मतदारांनी मतदान केले नाही त्यांची मने जिंकण्यासाठी ही यात्रा असणार आहे, असे युवा सेनेच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News