बलात्कार प्रकरणी आदित्य पांचोलीवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 June 2019

- वर्सोवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल.
- मुंबई पोलिस करत आहेत अधिक तपास.

मुंबई : हिंदी चित्रपट अभिनेता आदित्य पांचोली याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण 10 वर्षे जुने असून, याबाबतचा गुन्हा आज दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत. पीडितेने दिलेल्या तक्रारीमध्ये आदित्य पांचोलीने अनेकदा तिच्यावर बलात्कार केल्याचे म्हटले आहे. शिवाय याप्रकरणी तिने पांचोलीविरुद्ध लिखित तक्रारही नोंदवली होती. त्यानंतर आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वर्सोवा पोलिसांनी पांचोली विरोधात कलम 376, 328, 384, 341, 342, 323, 506 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News