स्वतःच्या कामाला पाहिले प्राधान्य देणारी अभिनेत्री

स्नेहल सांबरे
Monday, 26 August 2019

मी  मूळची मुंबईची. माझे शिक्षण अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे येथे झाले. पुढील शिक्षण घेण्याकरिता मी बॉस्टनला गेले. माझे आईबाबा दोघेही अभिनय क्षेत्रात कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अभिनयाची आमच्याकडे परंपराच आहे असे म्हणायला हरकत नाही. बॉस्टनला शिक्षण घेत असताना निर्माती अंबिका हिंदुजा यांनी माझी ‘तीन पत्ती’ या चित्रपटासाठी निवड केली. हा माझा पहिला चित्रपट. या वेळी मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

मी  मूळची मुंबईची. माझे शिक्षण अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे येथे झाले. पुढील शिक्षण घेण्याकरिता मी बॉस्टनला गेले. माझे आईबाबा दोघेही अभिनय क्षेत्रात कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अभिनयाची आमच्याकडे परंपराच आहे असे म्हणायला हरकत नाही. बॉस्टनला शिक्षण घेत असताना निर्माती अंबिका हिंदुजा यांनी माझी ‘तीन पत्ती’ या चित्रपटासाठी निवड केली. हा माझा पहिला चित्रपट. या वेळी मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे नक्कीच या चित्रपटात काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. त्यानंतर मी यश राज फिल्म्स बॅनरखाली ‘लव्ह का दी एंड’ हा कॉमेडी चित्रपट केला.

यशराज फिल्म्स बॅनरसोबत मी तीन चित्रपट करण्याचा करार केला होता, मात्र त्या वेळी मला महेश भट यांच्या ‘आशिकी २’ या चित्रपटाची ऑफर आली. ‘आशिकी २’ हा चित्रपट माझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटात मी गायिकेची भूमिका साकारली होती. अभिनयाबरोबर मला चांगले गाताही येते. यानंतर मी ‘बागी’, ‘हैदर’, ‘एक व्हिलन’, ‘एबिसीडी २’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटांमुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. 

आता दिग्दर्शक सुजीत यांचा ‘साहो’ हा चित्रपट येत आहे. ‘साहो’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते, तेव्हा मला डेंगी झाला होता. त्यामुळे आजारपणात चित्रीकरण करणे माझ्यासाठी एक आव्हानच होते. मी आजारी होते त्यामुळे थोडा त्रास झाला. पण लवकर बरी होऊन मी चित्रीकरण पूर्ण केले. ‘साहो’ चित्रपटाबद्दल सांगायचे झाले, तर या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरवात झाली तेव्हा आम्ही हा चित्रपट एका वर्षात पूर्ण करण्याचा विचार करत होतो. पण चित्रपटात बरेच ॲक्‍शन सीन्स असल्याने चित्रीकरणासाठी थोडा वेळ लागला.

आम्हाला ॲक्‍शन शिकवण्यासाठी ५० लोकांची टीम हॉलिवूडमधून भारतात आली होती. त्यांनी वेगवेगळ्या ॲक्‍शन सीन्सचे ट्रेनिंग आम्हाला दिले. या चित्रपटात मी अभिनेता प्रभाससोबत काम करत आहे. मी यापूर्वी प्रभासला कधीही भेटले नव्हते. या चित्रपटादरम्यान आमची भेट झाली आणि पहिल्याच भेटीत आमची खूप चांगली मैत्रीही झाली. प्रभास अत्यंत मनमिळावू स्वभावाचा आहे. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. चित्रपटात त्याच्यासोबत काम करताना मजा आली. 

माझी आई महाराष्ट्रीयन आहे. तिच्यामुळे मला थोडेफार मराठी बोलता येते. माझ्या वडिलांना मराठी येत नाही. त्यामुळे आईबरोबर बाबांच्या विरोधात काही बोलायचे असल्यास आम्ही मराठीत बोलतो. मला मराठी बोलायला आवडते. पण तितके स्पष्ट जमत नाही. अभिनयासोबत मला गाण्याची आवड आहेच, त्याशिवाय मला फॅशन करायलाही तितकेच आवडते. ‘साहो’नंतर माझे ‘छिछोरे’, ‘स्ट्रीट डान्सर’ हे चित्रपट भेटीला येणार आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News