27 व्या वर्षी मृत्यू झालेल्या या अभिनेत्रीच्या नावावर आहेत सर्वात जास्त रेप सीन!

आकांक्षा देशमुख (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019
  • या अभिनेत्रीने दिले होते सिनेमांमध्ये सर्वाधिक रेप सीन, कमी वयात झाला मृत्यू 
  • चित्रपटसुष्टीमध्ये तिला “बॉलीवुडची बहिण म्हणून ओळखल जायचं​
  • केलंय 30 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये  काम

मुंबई : बॉलिवुडमधील काही ठराविक कलाकार असतात कि, ज्यांच्या मूत्युनंतरही त्यांची आठवण काढली जाते. यामध्ये साठ आणि सत्तरच्या दशकातील अभिनेत्रींच्या यादीत नाजिमाच्या नावाची चर्चा आवर्जुन केली जोते. नाजीमाला खूप कमी लोक ओळखत असुन, मागील काळात नाजीमा सपोर्टींग अभिनेत्रीच्या नावाने फेमस होती. नेहमीच चित्रपटांमध्ये तिला छोट्या बहिणीचा रोल मिळायचा. चित्रपटसूष्टीमध्ये तिला “बॉलीवुडची बहिण म्हणून ओळखल जायचं”. मात्र नाजिमाच्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड आहे! खुप कमी लोकांना हे माहित आहे की तिने बॉलिवुड अभिनेत्रींच्या तुलनेत सर्वात जास्त रेप सीन केले आहेत. तुम्ही सुध्दा नाजिमा बाबत जाणून घेण्यासाठी खुप उत्सुक असाल. चला तर मग पाहुयात कशी होती नाजिमाची कथा.   

कमी वयात झाला होता मृत्यु 
अभिनेत्री नाजिमाने कमी वयातचं आपल्या नावाची ओळख बनवली होती. तिने बॉलिवुडमध्ये चित्रपटसूर्ष्टीत नाव कमवायला सुरुवात केली होती मात्र त्यावेळीचं तिला एका खतरनाक आजाराने घेरल होत. कॅन्समुळे नाजिमाचा 27 वर्षाच्या वयात 1975 मध्ये मृत्यू झाला. नाजिमाने आपल्या करियरची सुरुवात चाइल्ड आर्टिस्ट “बेबी चांद”या नावाने केली होती. या व्यतिरीक्त तिने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून देवदास, गंगा जमुना आणि हम पंछी एक डाल अश्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होत. तब्बल 30 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये तिने काम केलं होत. 

रेप सीन करण्यामागील कारण 
नाजिमाने चित्रपटांमध्ये खुप वेळा हिरो किंवा हिरोईनच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्या काळातील अनेक चित्रपटांमध्ये हिरो या हिरोईनच्या छोट्या बहिणीचा रेप होत असल्याचं दाखवल जात असे. त्यामुळे नाजिमाला सर्वात जास्त रेप सीन करावे लागले. 

या कारणामुळे चित्रपट निर्माते नव्हते देत लीडरोल
नाजिमाच्या मते चित्रपट निर्माते कधीच लीडरोल नाही द्यायचे. नाजिमाला भीती वाटायची कि, जर तिने छोट्या बहिणीची भुमिका साकारली नाही तर, चित्रपट मिळायचे बंद तर होणार नाही ना. त्यामुळे ती अश्या प्रकारची भुमिका साकारत होती. कधी तरी तिला चित्रपटामध्ये लीड रोल मिळेल अशी तिची अपेक्षा होती. नाजिमाने लीड रोलमध्ये फक्त एका चित्रपटात काम केल आहे. या चित्रपटाचं नाव “दयार ए मदीना” असुन हा सिनेमा1975 मध्ये रिलीज झाला होता. नाजिमाचा “रंगा खुश” हा चित्रपट तिच्या मृत्यू नंतर रिलीज झाला होता. 

नाजिमाचे चित्रपट क्षेत्रातील करीयर 
नाजिमाचे चित्रपट क्षेत्रातील करियर खुप कमी होता. 10 वर्षाच्या करीयरमध्ये नाजिमाने 30 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या दरम्यान तिने अनेक हिट चित्रपट सुध्दा दिले होते. नाजिमाने 1961मध्ये “उमर कैद”, 1964मध्ये “जिद्दी” चित्रपटांमध्ये काम केलं होत. याव्यतिरीक्त  “निशान” 1965, “आए दिन बहार के” 1966, “राजा और रंक” 1968, “डोली” 1969, “अधिकार” 1971, “मेरे भैया” 1972, “बेइमान” 1972, “हनीमून” 1973, “अमीर-गरीब” 1974 या चित्रपटांमध्ये झळकली होती. 1975मध्ये संन्यासी या चित्रपटामध्येही तिने जबरदस्त भूमिका साकारली होती.             

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News