बिकिनीमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या दिलखेचक अदा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 12 August 2019
  • बिकिनीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले
  • दिलखेचक अदा यासाठी ओळखली जाणारी स्मिता
  • स्मिताने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला
  • " ये रे ये रे पैसा 2" या चित्रपटातही ती झळकली

नुकताच स्मिताने तिचे बिकिनीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या ग्लॅमरस अंदाज, बोल्ड लूक, आणि दिलखेचक अदा यासाठी ओळखली जाणारी स्मिता गोंदकर  ही बिग बॉस मराठी पर्व पहिलेमधील सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. स्मिता ही "पप्पी दे पारूला" या गाण्यामुळे घराघरात पोहोचली होती आणि बिग बॉस मराठीमुळे ती खऱ्या अर्थाने प्रसिध्द झाली त्यामुळे तिचा चाहता वर्गदेखील मोठा आहे.

यातूनच स्मिताने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला असून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. तिच्या या बिकिनीमधील हॉट अंदाजाने अनेकांची मने जिंकली असून स्मताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करून हॉट ,ग्लॅमरस अंदाजाने सगळ्यांना घायाळच केले आहे  ते आपल्यालाही दिसतच आहे.

तसेच नुकतेच आलेल्या " ये रे ये रे पैसा 2" या चित्रपटातही ती आपल्याला दिसली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News