'ही' अभिनेत्री असेल 'बिग बॉस 13'च्या घरातील महागडी स्पर्धक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 September 2019

यावर्षी बिग बॉस सीजन 13 लवकरच सुरू होत आहे. घरात स्पर्धकांच्या एन्ट्रीची वेळ जवळ येतेय तशा वेगवेगळ्या बातम्याही ऐकायला मिळत आहेत. टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाली आहे. रश्मी या सिजनमधील घरात येणारी सर्वात महागडी स्पर्धक असेल. वेबपोर्टल पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, रश्मीला घरात एन्ट्री घेण्यासाठी जवळपास 1 करोड 20 लाख रुपये दिल्या गेले आहेत. ती घरात तिचा बॉयफ्रेंड अरहान खान सोबत एन्ट्री करणार आहे. 

रश्मीच्या लोकप्रियतेमुळे तिला सर्वात मोठी रक्कम दिली जात असल्याचे बोलले जात आहे. चर्चा अशीही आहे की, एका स्पर्धकाला फायनलचे तत्काळ तिकीटही मिळेल. हा शो29 सप्टेंबरपासून रोज रात्री 10:30 वाजता आणि विकेंड प्रसारण रात्री 9 वाजता असेल. 

सलमान खानचा हा शो आता नवीन ठिकाणी शूट होणार आहे. 'बिग बॉस'साठीचं हे नवीन घर प्लास्टिक फ्री आहे. या सेटवर फाइबर और पीओपी (प्लास्टर ऑफ पेरिस) चा जास्त वापर झाला आहे. मुंबईत गोरेगांव फिल्म सिटी येथे हे नवीन लोकेशन आहे. 'बिग बॉस'च्या घरात जवळपास 93 कॅमेरा लागलेले आहेत. यावेळी घरात 14 बेडची सोय केली गेलेली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News