'या' अभिनेत्रीने स्वतःचे नाव बदलले 

यिनबझ ऑनलाईन टीम
Monday, 18 February 2019

काही दिवसांपूर्वीच सोनम कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ चित्रपट प्रदर्शित झाला. तिचा हा चित्रपट तिकीटबारीवर फारसा कमाल करू शकला नाही. या चित्रपटाच्या अपयशानंतर सोनम तिच्या नव्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे.

‘द झोया फॅक्‍टर’ या चित्रपटात ती झळकणार आहे. सध्या ती या चित्रपटाचं प्रमोशन करतेय. सोनमने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क स्वतःचं नावच बदललं आहे. सोनमने ‘झोया सिंग सोलंकी’ असं तिचं नाव केलं आहे.

सोनमने विवाह झाल्यानंतर सोनम आनंद आहुजा नाव केलं होतं. आता हे नाव बदलून तिने तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्‌विटर अकाऊंटवर ‘झोया सिंग सोलंकी’ हे नाव ठेवलं आहे. सोनमचा हा नवा प्रमोशनल फंडा आहे.

‘द झोया फॅक्‍टर’मध्ये ती अभिनेता दलकीर सलमानबरोबर काम करणार आहे. तर अभिषेक शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील. पण सोनमचा हा प्रमोशन फंडा सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News