अभिनेते वरूण ठाकूर करणार कॉमेडीचे सूत्रसंचालन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 12 August 2019
  • वरुण या कॉमेडी शोचे सूत्रसंचालन करणार
  • अभिनेता वरुण ठाकूर ‘जब तक है जान’ या चित्रपटातून आले
  • कॉमेडी शो डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित

अभिनेता वरुण ठाकूर ‘जब तक है जान’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला. तो अभिनेत्यापेक्षा उत्तम कॉमेडियन म्हणून प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस पडला.

आता लवकरच तो ‘स्टर्लिंग रिझर्व्ह कॉमेडी प्रोजेक्‍ट’ नावाचा एक कॉमेडी शो घेऊन येत आहे. वरुण या कॉमेडी शोचे सूत्रसंचालन करणार आहे. विशेष म्हणजे हा कॉमेडी शो डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. या शोमध्ये देशभरातील विनोदवीरांना सहभागी करून 
घेतले जाणार आहे.

उत्तम कॉमेडियन असलेला वरुण त्याच्या हसऱ्या अंदाजात प्रेक्षकांना कसा हसवणार आहे, याची उत्सुकता लागली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News