अभिनेता ताहीर लवकरच ‘८३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

अभिनेता ताहीर राज भसीन क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची भूमिका साकारणार आहे.

अभिनेता ताहीर राज भसीन लवकरच ‘८३’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात तो क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची भूमिका साकारणार आहे. यासाठी तो रोज सुनील गावस्कर यांचे व्हिडीओ पाहून त्यांची बॉडी लॅंग्वेज समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.

त्यानंतर आठवड्यातील पाच दिवस रोज दोन तास अधिक क्रिकेटचा सराव करायचा. याबाबत ताहीर सांगतो, ‘सुनील गावस्कर यांना रूपेरी पडद्यावर दाखवणे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी होती. मी गावस्कर स्टाईल शिकण्यासाठी खूप सराव केला आहे.’ 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News