अभिनेता संजय सुरीचा बालमजुरीवर ‘झलकी’
‘सिकंदर’, ‘अनुभव’, ‘हिरोईन’सारख्या चित्रपटांतून अभिनेता संजय सुरी प्रेक्षकांसमोर आला. याशिवाय ‘मेंटलहूड’ सारख्या गाजलेल्या वेबसीरिजमधून त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता बालदिनाचे औचित्य साधून तो ‘झलकी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला. या चित्रपटातून बालमजुरीसारखा सामाजिक प्रश्न प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्रह्मानंद सिंग यांनी केलं आहे. निर्मिती आनंद चव्हाण आणि ब्रह्मानंद सिंग यांनी मिळून केली आहे. संजयसह या चित्रपटात अभिनेता बोमन इराणी, अखिलेंद्र मिश्रा, जॉय सेनगुप्ता, अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, दिव्या दत्ता हे कलाकार झळकले आहेत.