अभिनेता रणवीर सिंहची ‘नटराज’ पोज'

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019

अभिनेता रणवीर सिंहच्या ‘८३’ चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून बरीच चर्चा आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत पूर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे एक नवीन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये रणवीर टुनब्रिज वेल्स मैदानावर १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेचे माजी कॅप्टन कपिल देव यांची प्रसिद्ध पोज ‘नटराज पोज’मध्ये दिसून येते आहे.

 या पोस्टरमध्ये तो हुबेहूब कपील देव यांच्यासारखा दिसून येत आहे. त्यामुळे रणवीरच्या या लूकसाठी रणवीर आणि त्याच्या मेकअप आर्टिस्टने कीती मेहनत घेतली आहे हे पाहायला मिळते आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत अभिनेता ताहिर राज भसीन, साकिब सलीम, चिराग पाटील, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि काही इतर कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आता रणवीरची ही पोज पाहून चाहत्यांची या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News