अभिनेते मोहन जोशी यांचा नवा चित्रपट ‘प्रीत अधुरी’ लवकरच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 October 2019

चित्रपटाच्या बेबीताई पोवार या प्रस्तुतकर्त्या असून कांचन जाधव, मीनाक्षी शिंदे, पद्मावती संपत आणि रेखा भीमराव यांचा या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा सहभाग आहे.

देशभक्तिपर आणि बायोपिक चित्रपटांची सध्या चलती असली, तरी रोमॅण्टिक आणि ॲक्‍शनपट चित्रपटांनाही तितकाच प्रतिसाद मिळत आहे. आता ‘प्रीत अधुरी’ हा चित्रपट चित्रपटप्रेमींच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटात अभिनेता मोहन जोशी, अशोक शिंदे यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. रोमान्स, ॲक्‍शनचा भरणा असलेल्या या चित्रपटाच्या बेबीताई पोवार या प्रस्तुतकर्त्या असून कांचन जाधव, मीनाक्षी शिंदे, पद्मावती संपत आणि रेखा भीमराव यांचा या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. विशेष म्हणजे महिला निर्मात्यांनी एकत्र येत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News