अभिनेत्री जेनेफर विंगेट वेगळ्या भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019

अभिनेत्री जेनेफर विंगेट ‘सरस्वतीचंद्र’, ‘बेहद’, ‘कसौटा जिंदगी की’ अशा अनेक मालिकेतून समोर आली.

अभिनेत्री जेनेफर विंगेट ‘सरस्वतीचंद्र’, ‘बेहद’, ‘कसौटा जिंदगी की’ अशा अनेक मालिकेतून समोर आली.

तिची ‘बेपनाह’ मालिकेतील भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर ती आता वेबसीरिजमध्ये पदार्पण करीत आहे. अल्ट बालाजीच्या ‘कोड एम’ या वेबसीरिजमधून ती प्रेक्षकांसमोर येणार आहे.

यात ती मोनिका मेहेर या आर्मी ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. नुकताच तिचा हा लूकही व्हायरल झाला आहे. त्यात तिने आर्मी ऑफिसरचे कपडे परिधान केले आहेत. ग्लॅमरस जेनेफरचा आर्मी लूक आणि तिची ही भूमिका प्रेक्षकांना आपलंसं करते का, हे काही दिवसांत स्पष्ट होईलच.

 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News