अभिनेता हृतिक रोशनचा नवा चिञपट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

नुकतेच ‘सुपर ३०’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाचे हे नवीन पोस्टर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

अभिनेता हृतिक रोशनचे बॉलीवूडमध्ये ‘क्रिश’, ‘अग्निपथ’, ‘काबील’सारखे चित्रपट हिट ठरले. आता तो त्याच्या ‘सुपर ३०’ चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता.

आता नुकतेच त्याच्या या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हृतिकने त्याच्या सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये हृतिक काही विद्यार्थांसह पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे.

 

तसेच या पोस्टरवर चित्रपट प्रदर्शनाची तारीखदेखील आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याने बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. आता हा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट गणितज्ञ आनंदकुमार यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे.

चित्रपटाचे हे नवीन पोस्टर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News