अभिनेता गोविंदा मानसिकदृष्ट्या आजारी; जवळच्या मित्रांकडून धक्कादायक खुलासा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता गोविंदाने नुकतीच एक विशेष मुलाखत दिली होती. यावेळी गोविंदा असं म्हणाला की, २००९ मध्ये रिलीज झालेला जेम्स कॅमरुनचा हॉलिवूडचा सिनेमा 'अवतार'चं टायटल त्यानेच सुचवलं होतं.

मुंबई: काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता गोविंदाने नुकतीच एक विशेष मुलाखत दिली होती. यावेळी गोविंदा असं म्हणाला की, २००९ मध्ये रिलीज झालेला जेम्स कॅमरुनचा हॉलिवूडचा सिनेमा 'अवतार'चं टायटल त्यानेच सुचवलं होतं. एवढंच नव्हे तर त्याला या सिनेमात  काम करण्यातबाबत विचारणा झाली होती. गोविंदाच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. अनेकांनी तर त्याच्याशी निगडीत मीम्स देखील शेअर केले.  काही माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, गोविंदाच्या जवळचे मित्र म्हणत आहेत की, गोविंदा मानसिक समस्येतून जात आहे. 

आज सिने इंडस्ट्रीत गोविंदाचा कोणीही मित्र नाही. त्यामुळेच आता त्याला कुणी मदत करण्यासाठी देखील पुढे येत नाही.' याचं कारण म्हणजे एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, 'गोविंदा हा मागील काही दिवसांपासून थोडसं विचित्र वर्तन करतो आहे. मी या मोठ्या सिनेमाची ऑफर नाकारली, मी त्या सिनेमाची ऑफर नाकारली. असं बोलत राहणं ही आता गोविंदाची सवय झाली आहे. त्याच्या याच नकारात्मक स्वभावामुळे अनेक डिस्ट्रीब्यूटरने तिच्या मागील सिनेमा रंगीला राजा याकडे पाठ फिरवली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News