आंतराष्ट्रीय स्पर्धेत आयएमआर महविद्‌यालयाचे घवघवीत यश

अंकुश सोनवणे
Friday, 8 February 2019

विजेत्या संघात एमबीए अभ्यासक्रमाचे सहभागी विद्यार्थी सुरेंद्र सोनी, आकांशा जैन, काव्या बेदमुथा, विशाल व्यास, हर्ष संचेती, यांचा समावेश होता. त्यांना प्रा. पराग नारखेडे, प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे केसीई संस्थाध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आयएमआर महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शिल्पा बेंडाळे विभागप्रमुख प्रा.विशाल संदानशिव यांनी अभिनंदन केले आहे. 

जळगाव - केरळ येथील आयआयएम कोझीकोड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय व्यवसाय नियोजन स्पर्धेत देशभरातील 66 संघानी सहभाग घेतला होता. त्यात जळगावच्या केसीई संस्थेच्या आयएमआर महाविद्‌यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकवला 25000 रू. चा धनादेश व स्मृतीचिन्ह असे या पुस्काराचे स्वरुप आहे. या संघाला भविष्यात आशियाई स्पर्धेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. ही संधी जळगावसारख्या शहरातील महाविद्यालयाला मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आंनद व्यक्त केला आहे. 

आय एम आर महाविद्यालयाच्या संचालिका शिल्पा बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल बोलतांना समाधान व्यक्त केले. गेल्या पाच वर्षापासुन महाविद्यालया तर्फे यश मिळवण्यासाठी प्रयत्न कायम ठेवले. जळगावसारख्या शहरात विद्यार्थ्यांना काही करायचे असल्यास त्यांना सकारात्मक विचार तसेच सर्व साधने उपस्थित करुन देणे म्हत्वाचे असते. जिंकने हा आमचा उद्देश नव्हता, तर आमच्या विद्यार्थ्यांनी देश हितासाठी विचार करुन काम करावे व अपयश आल्यावर खचुन न जाता सातत्य ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले त्याचेच हे यश असल्याचे बेंडाळे यांनी सांगितले. 

देशभरात विविध ठिकाणी गेल्या 6 वर्षापासून ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. आयएमआर महाविद्‌यालय मागील 5 वर्षापासुन या स्पर्धेत सहभाग घेत आहे. तीनवेळा या महाविद्‌यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.

यंदाच्या वर्षी केरळमध्ये झालेल्या या स्पर्धेत गोरखपुर, कोलकात्ता, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली आदी शहरातील विविध संस्थाच्या संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अशा दिग्गज संघासमोर जळगावच्या आयएमआर महाविद्‌यालयाच्या विद्‌यार्थ्यानी पेव्हरब्लॉकमध्ये सिंमेटचा वापर न करता प्लास्टिक आणि मातीच्या खडकांचा वापर कसा करावा यांचे प्रात्याक्षिक दाखविले. त्यामुळे निसर्गाचे संतुलन टिकुन राहण्यासमदत होते आणि घातक प्लास्टिकचा पुनर्वापरदेखील कसा होतो, याचे नियोजन कौशल्यपुर्ण पध्दतीने विद्‌यार्थ्यांनी सादर केले. 

लवकरच पेंटंट साठी नोंदणी करणार
हा प्रकल्प भविष्याचा विचार करता देशात म्हत्वाचा ठरणारा आहे लवकरच पेंटंट नोंदणी करुन त्याच्यावरती काम सुरु करणार असल्याची माहीती विद्यार्थ्यांनी दिली. 

विजेत्या संघात एमबीए अभ्यासक्रमाचे सहभागी विद्यार्थी सुरेंद्र सोनी, आकांशा जैन, काव्या बेदमुथा, विशाल व्यास, हर्ष संचेती, यांचा समावेश होता. त्यांना प्रा. पराग नारखेडे, प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे केसीई संस्थाध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आयएमआर महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शिल्पा बेंडाळे विभागप्रमुख प्रा.विशाल संदानशिव यांनी अभिनंदन केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News