भाजपला मतदान केल्याचा आरोप करत 'या' पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

बुहजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची विश्रामगृहावर बैठक सुरु असताना लोकसभा निवडणुकीत पैसे घेऊन भाजपला मतदान केल्याचा आरोप करत, कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.

अमरावती : बुहजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची विश्रामगृहावर बैठक सुरु असताना लोकसभा निवडणुकीत पैसे घेऊन भाजपला मतदान केल्याचा आरोप करत, कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. अमरावतीत हा प्रकार घडला. बसपाचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजने यांच्यासह अन्य नेत्यांना खुर्च्या फेकून, कपडे फाडून मारहाण केली. यातील काही नेते अक्षरशः पळून गेले. यावेळी ताजने हटाव बीएसपी बचाव अशी घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. निवडणुकीत पैसे खाल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत बसपाच्या नगरसेवकांनी पैसे घेऊन भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांना मतदान केल्याचा आरोप आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या नेत्यांनी पक्ष विकल्याचा आरोप आरपीआय कार्यकर्त्यांचा आहे.

बुहजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी संदीप ताजणे, राष्ट्रीय महासचिव सुरेश रैना, कृष्णा बेले प्रदेश महासचिव, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार या नेत्यांना मारहाण करण्यात आली. अमरावती येथील शासकीय विश्रामगृहावर हा सर्व राडा झाला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News