परिवहन अधिकारी अस्मिता दिघावकर यांचे आकस्मिक निधन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

ठाणे - अंधेरी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या अस्मिता दिघावकर यांचे मंगळवारी आकस्मिक निधन झाले. अस्मिता दिघावकर या विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या पत्नी होत्या. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील राहत्या घरी मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास त्या बाथरूममध्ये पडल्याचे निमित्त होऊन निधन झाले.

बराच वेळ त्या बाथरूममधून बाहेर न आल्याने जेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा त्या कोसळलेल्या स्थितीत आढळून आल्या. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News