सहा जीवांपेक्षा पैसा झाला मोठा; पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • गाडी चालक आणि त्याची बायको वाचली पण दोन निष्पाप बळी गेले.
  • बाकीच्यांची जगण्याची धडपड अजूनही सुरु आहे.

मुंबई : शिवडी येथील बसथांब्यावर उभ्या असलेल्या सहा जणांना एका भरधाव मोटारीने धडक दिली. या सहा जणांना के.ई.एम हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी एडमिट करण्यात आले. उपचारादरम्यान आतापर्यंत दोघांचे मृत्यू झाले तर चौघे गंभीर जखमी आहेत. त्यापैकीच एक जखमी कल्पेश धारगे तरुणाचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. 

श्रीमंत आणि मुजोर मोटार चालक आणि त्याच्या बायकोने बस स्थानकावर उभे असलेल्या ६ निष्पाप लोकांना चिरडले. गाडीचा वेग इतका होता की, त्यातील जीव रक्षक हवेचे फुगे (Airbags)बाहेर आले. गाडी चालक आणि त्याची बायको वाचली पण दोन निष्पाप बळी गेले. बाकीच्यांची जगण्याची धडपड अजूनही सुरु आहे. त्यात गाडी चालक शाबाझ अब्दुल्ला बादी आणि त्याची बायको अमरिन सिद्दिकी बादी ही त्याच्या मांडीवर बसुन गाडी चालवत होती, असे प्रत्येक्षदर्शीनी सांगितले. अशाप्रकारे गाडी चालवत असताना गाडीवरचे नियंत्रण सुटलं आणि बसस्थानकावर उभ्या असलेल्या लोकांवर आदळली.

गुन्हा दाखल करण्यासाठी सबळ पुरावा नव्हता, म्हणून गुन्हा उशिरा दाखल केला. एवढे मोठा गंभीर गुन्हा असूनसुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली. मोटार चालकाला आणि त्याच्या बायकोला साधं खरचटलं सुद्धा नाही तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी पोलिसांची उठाठेव चालू होती. पोलिसांनीच त्या दोघांना ऍडमिट केले व त्यांची काळजी खुद्द पोलीस आणि डॉक्टर घेत होते. यामध्ये त्या सहा जणांकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले होते.

 

न्याय न मिळाल्यास मंत्रालयात जाण्याचा इशारा 
जखमी कल्पेशचा सोमवारी के.ई.एम.मध्ये मृत्यू झाल्याचे कळताच त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी असा सुमारे २०० ते २५० जणांचा जमाव हॉस्पिटल भोवती जमा झाला. त्यांनी अपघातातील मोटचालकाच्या विरोधात अजामीपत्र गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करीत कल्पेशचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. काही जणांनी अपघात कक्षातील दरवाजातील आसनांची तोडफोड केली. सायंकाळी कल्पेशचा मृतदेह त्याच्य नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास मंत्रालयापर्यंत रॅली काढण्याचा इशारा त्याच्या मित्रांनी दिला. मंगळवारी गांधी रुग्णालयाजवळ मेणबत्या पेटवून त्याला श्रद्धांजली त्याला वाहण्यात आली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News