वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश; ऑनलाईन अर्जांवर प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 July 2019

प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज जोडले होते. ही प्रक्रिया शनिवार २९ जूनपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू झाली.

अकोला - वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांच्या मूळ दस्तऐवजाच्या पडताळणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरुवात झाली. ही प्रक्रिया ४ जुलैपर्यंत चालणार असल्याची माहिती जीएमसीचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे यांनी मंगळवारी (ता.०२) ‘सकाळ’ला दिली. नीट उत्तीर्ण विद्याथ्यानी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी  ऑनलाइन अर्ज केले होते.

प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज जोडले होते. ही प्रक्रिया शनिवार २९ जूनपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू झाली. पहिल्याच दिवशी ४४० विद्यार्थ्यांच्या दस्तऐवजची पडताळणी पूर्ण झाली आहे.  विद्यार्थ्यांच्या दस्तऐवजांची पडताळणी सुरु आहे.

गुरुवार ४ जुलै रोजी एससी, एसटी, व्हीजे, एनटी-१, एनटी-२ आणि एनटी-३ यासह ओबीसी, एसबीसी, एसईबीसी या आरक्षीत प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मूळ दस्तऐवज तपासण्यात येणार आहे. याकरिता बुलडाणा आणि अकोला  जिल्ह्यांसाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे केंद्र आहे. 

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी दस्ताएेवज पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. ४ जुलैपर्यंत ही प्रक्रीया चालणार आहे. 
-डॉ.कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता मेडिकल कॉलेज, अकोला

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News