जगण्यात गांधींचा साधेपणा स्वीकारा: बनवारीलाल पुरोहित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019
  • मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा दीक्षांत समारोह

वर्धा: गांधी- विनोबांचा वारसा लाभलेला हा जिल्हा आहे. वैद्यकीय शिक्षणाचा आणि आरोग्यसेवेचा वसा आपण स्वीकारला आहे. युवा ही देशाची अशी शक्ती असते, जी स्वप्ने पाहते, त्या स्वप्नांना विचारांची जोड देते आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीतून समाज आकाराला येतो. आपल्या स्वप्नांना आयाम देताना गांधींचे साधेपणाने जगणे युवा पिढीने स्वीकारावे, असे आवाहन तामीळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा दहाव्या दीक्षान्त समारोहात केले. 

सावंगी (मेघे) येथील विद्यापीठ सभागृहात आयोजित या समारोहात बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी, विविध आयुर्विज्ञान शाखांतील एकूण ७१६ विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून आरोग्यसेवेची दीक्षा प्राप्त केली. या दहाव्या दीक्षान्त समारोहात वैद्यकीय शाखेतील अक्षदा शर्मा ही विद्यार्थिनी सर्वाधिक पुरस्कारांची मानकरी ठरली. तिला आठ सुवर्णपदके व तीन रोख पुरस्कार प्राप्त झाली. 
 

यासोबतच, श्यामोलिम भुयान हिला पाच सुवर्णपदके व एक रोख पुरस्कार, शरण्या राय हिला तीन सुवर्णपदके व एक रोख पुरस्कार, सुशमा एस. हिला दोन सुवर्ण व दोन रजतपदके, प्रियाल मीधडा हिला दोन सुवर्ण पदके प्राप्त झाली. स्नातकोत्तर अभ्यासक्रमातील ए.डी. मेडिसिनचे डॉ. अमीत फकळे यांना सात सुवर्णपदके तर ए.डी. सर्जरीचे डॉ. विवेक सिन्हा यांना चार सुवर्णपदके प्राप्त केली. आयुर्वेद अभ्यासक्रमात रोझिना शेख रझा ही सर्वाधिक पुरस्कारांची मानकरी ठरली असून तिला तीन सुवर्ण, एक रजत पदक व तीन रोख पुरस्कार प्राप्त झाले. तर दंतवैद्यकशास्त्राची विद्यार्थिनी मेघा अग्रवाल हिला तीन सुवर्ण पदकांची मानकरी ठरली. 

या समारोहात कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचा शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील योगदानाकरिता राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समारोहाला कुलगुरू डॉ. राजीव बोरले, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, डॉ. सतीश देवपुजारी, प्र-कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, डॉ. एस. एस. पटेल, कुलसचिव डॉ. ए. जे. अंजनकर, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉ. अभय मेडे, डॉ. ललित वाघमारे, दंतविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधीन्द्र बालिगा, आयुर्वेद शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, परिचर्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. सीमा सग, रवी मेघे, डॉ. डी. के. अग्रवाल, डॉ. गौरव मिश्रा, डॉ. आलोक घोष, डॉ. मीनल चौधरी, डॉ. सुनीता वाघ, डॉ. तृप्ती डेहणे, डॉ. के.के. सिंग, डॉ. प्रीती देसाई, डॉ. वैशाली ताकसांडे, डॉ. प्रज्ञा निखाडे, डॉ. एम. इर्शाद, डॉ. सुनीता श्रीवास्तव, डॉ. आदर्शलता सिंग, ब्रजेश लोहिया यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. तृप्ती वाघमारे, डॉ. नाजनीन काझी, डॉ. समीर शुक्ल यांनी केले. समारोहाची सुरुवात आणि समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. तत्पूर्वी संजना बासू हिने पसायदान सादर केले. दीक्षान्त समारोहाला विद्यार्थी आणि शिक्षकांसोबतच पालक तसेच गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News