भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकहिताच्या कामांवर "एसीबी'चा वॉच 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019
  • पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांची माहिती; कारवाईसोबतच जनजागृतीला प्राधान्य

सोलापूर : शासनाच्या माध्यमातून सुरु असलेल्या लोकहिताच्या योजना, कामांच्या ठिकाणी जर भष्टाचार, गैरव्यवहार होत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग स्वत:हून लक्ष घालून कारवाई करणार आहे. त्याअनुषंगाने सर्वांना सूचना देण्यात आल्याची माहिती पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी शनिवारी दिली. 

कार्यालयीन कामानिमित्त पोलिस अधीक्षक दिवाण हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलिस अधीक्षक दिवाण म्हणाले, "अनेकांना लाचेसंदर्भात तक्रार कशी करावी माहिती नसते, त्यामुळे आम्ही व्यापक प्रमाणात जनजागृती करीत आहोत. पाच जिल्ह्यात आठवडा बाजार, यात्रेचा दिवस तसेच सार्वजनिक ठिकाणी पथके पाठवून जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.' 

लाचेच्या प्रकरणात शिक्षा लागण्याचे प्रमाण वाढावे यासाठी जिल्ह्यातील सरकारी वकिलांची बैठक घेण्यात आली आहे. जनजागृतीसाठी पूर्वी भित्तीपत्रके लावली जात होती, पॉम्ल्पेट वाटप केले जायचे आता आम्ही एसीबीचा क्रमांक असलेले व्हिझिटींग कार्ड देत आहोत. 

पुणे विभागात पहिल्या सहा महिन्यात शंभर कारवाया झाल्या असून गतवर्षीच्या तुलनेत कारवाईमध्ये वाढ झाली आहे. शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी पुणे विभागाच्या पाच जिल्ह्यांसाठी सातारा येथे कार्यशाळा घेण्यात आली आहे. गुन्ह्यातील विसंगतीचा फायदा घेऊन लाचखोर सुटतात. याचा विचार करुनच पुरावे अधिक भक्कमपणे गोळा करण्याचे काम प्रभावीपणे केले जात आहे, असेही पोलिस अधीक्षक दिवाण यांनी सांगितले. 

सापळा कारवाईत तक्रारदार महत्वाचा असतो. यात आम्हाला स्वत:हून कारवाई करता येत नाही. तक्रारदार शेवटपर्यंत टिकला पाहिजे हे महत्वाचे असते असेही पोलिस अधीक्षक दिवाण यांनी यावेळी सांगितले. यावेळी सोलापूर एसीबी सहायक पोलिस आयुक्त अजितकुमार जाधव, पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, कविता मुसळे उपस्थित होते. 

लोकहितांच्या कामात, योजनांमधील गैरव्यवहार टाळण्यासाठी लाचलुचपत प्रतिंबधक विभागाचे पथक स्वत:हून त्याठिकाणी जावून चौकशी करेल. तेथील लोकांशी बोलून गैरव्यवहार, भ्रष्टाचार होत असल्याने कारवाईच्या अनुषंगाने प्रक्रिया पार पाडली जाईल. लाचेच्या कारवाईसोबत आम्ही प्रबोधनावर भर दिला आहे. 
- संदीप दिवाण, पोलिस अधीक्षक, एसीबी पुणे विभाग

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News