"अबोल मैत्री"...

साक्षी रामदास साळुंखे, सातारा
Saturday, 3 August 2019

मैत्री असावी त्या "दिपस्तंभासारखी" , जी भरकटलेल्या जहाजाला योग्य दिशा देईल. रोज भेटावं, रोज बोलावं, हे कधीच खऱ्या मैत्रीला गरजेचं नसतं; कारण...

जगातील सर्वात महत्त्वाचं शस्त्र जर कोणतं असेल तर ते म्हणजे.. मैत्री ! "मैत्री" असावी दूधात  मिसळलेल्या पाण्यासारखी,  जेव्हा दूधात पाणी मिसळलं जातं तेव्हा ते पाणी स्वत:  दूध बनतं व त्यामुळे त्याचं अस्तित्व किती तरी पटीने वाढलं जातं.

पण; हे इतक्यातचं संपत नाही तर, जेव्हा दूध उकळायला ठेवलं जातं तेव्हा पाणी स्वत: आधी ती उष्णता सहन करतं, स्वत: च्या अस्तित्वाला  वाफ बनवून निघून जातं... परंतु; त्याच्या जाण्याने दूध मात्र उकळून त्याच्या विरहात भांड्याबाहेर येतं..! म्हणजे एकूणचं  यावरून आपल्या लक्षात येईल की मैत्री जरी दिसली नाही तरी चालेल पण ती जाणवली नक्कीच पाहिजे.

मैत्री असावी त्या "दिपस्तंभासारखी" , जी भरकटलेल्या जहाजाला योग्य दिशा देईल. रोज भेटावं, रोज बोलावं, हे कधीच खऱ्या मैत्रीला गरजेचं नसतं; कारण जेव्हा आपण एखाद्या सोबत मैत्री करतो, त्यावेळी आपलं मन त्यांच्यासोबत जोडलं जात, म्हणूनच तर ती मैत्री त्या "वटवृक्षाप्रमाणं" दिवसागणिक खोलवर रुजली जाते आणि हीच मैत्री प्रत्येक वेळी "अबोल" डोळ्यांसारखी राहून  शब्दांवीना सारं समजून घेते.

 

 

 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News