अभिनंदन यांच्या मार्गदर्शकाचा ‘युद्ध सेवा’ पदकाने गौरव 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 16 August 2019
  • ‘युद्ध सेवा’ पदक मिळालेल्या पहिल्या महिला अधिकारी
  • पाकिस्तानचे एफ १६ विमान पाडत असताना केले होते  मार्गदर्शन

नवी दिल्ली : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानचे एफ १६ विमान पाडत असताना त्याला मार्गदर्शन करणाऱ्या स्वार्डन लीडर मिंटी अगरवाल यांचा ‘युद्ध सेवा’ पदकाने गौरव करण्यात आला आहे. 

मिंटी यांनी बालाकोट हवाई हल्ल्याच्यावेळी तसेच त्यानंतरच्या पाकिस्तान हवाई दलाच्या चकमकीच्यावेळी वैमानिकांना मार्गदर्शन केले होते. युद्ध सेवा पदकाने गौरवलेल्या मिंटी या पहिल्या सैनिकी आधिकारी ठरल्या आहेत. 

विंग कमांडर अभिनंदनच्या विमानाने उड्डाण केल्यापासून मी त्यांना परिस्थितिची जाणीव करून देत होते. त्यांनी एफ-१६ विमान पाडल्याचे मला स्क्रीनवर दिसले. त्यांनी विमानावर हल्ला करण्याची अचूक वेळ साधली होती, असेही मिंटी यांनी सांगितले.

बालाकोट हल्ल्यानंतर प्रतिहल्ला होणार हे हवाई दल जाणून होते. आपण लष्कर नसलेल्या ठिकाणी हल्ला केला होता. त्याचे प्रत्युत्तर अपेक्षितच होते. त्यासाठी आम्ही तयार होतो. त्यांनी २४ तासातच प्रतिहल्ला केला. सुरुवातीस काही विमानेच होती, पण हळूहळू ती वाढत गेली. आपल्या भूमीत नुकसान करण्यासाठीच पाकिस्तानी विमाने आली होती. मात्र आपले पायलट, नियंत्रक तसेच आमच्या पथकामुळे त्यांची मोहीम अपयशी ठरली, असेही त्यांनी सांगितले.

अभिनंदनना परतण्यास सांगत होते, पण...
अभिनंदनना त्यादिवशी मागे फिरण्यास सांगत होते. पण माझ्या सूचनाच त्यांच्यापर्यंत गेल्या नाहीत. पाकिस्तान हवाई दलाने संपर्क यंत्रणेत जॅमर लावले होते, असेही मिंटी यांनी सांगितले. अभिनंदन यांना त्यानंतर पाकिस्तानने आपल्या ताब्यात घेतले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News