अभिमानाच मंगळसूत्र...

उर्मिला शहा
Monday, 3 June 2019

देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं 
तू घातलेलं मंगळसूत्र 

देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं 
तू घातलेलं मंगळसूत्र 
अभिमानाने...
आनंदाने..
मिरवताना 
कळत नकळत 
काळजावर व्रण उठेपर्यंत 
वाट्या रुतत राहिल्या. 
कुठेतरी तुटलेली 
बाऽऽऽरीकशी तार
गळ्यावर मानेवर 
रात्र रात्र 
टोचत राहिली.
तसं
बदलता येईल मंगळसूत्र 
किंवा 
करता येईल नवीन 
पण..ते व्रण...?
ते कशाने जातील?
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News