‘बाबा’मध्ये झळकणार अभिजीत खांडकेकर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 16 July 2019

अभिनेता अभिजीत खांडकेकर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील भूमिकेमुळे घराघरात पोहोचला आहे. लवकरच तो ‘बाबा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यातील त्याचा लूक सध्या व्हायरल झाला आहे.

मुंबई : अभिनेता अभिजीत खांडकेकर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील भूमिकेमुळे घराघरात पोहोचला आहे. लवकरच तो ‘बाबा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यातील त्याचा लूक सध्या व्हायरल झाला आहे.

संजय दत्त प्रॉडक्‍शनच्या सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात अभिजीत राजन हे पात्र साकारणार आहे. नुकतच या चित्रपटाचा टिजर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर. गुप्ता यांनी  केले आहे. अभिजीतला या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News