अमरावती विद्यापीठाच्या प्रलंबित निकाला विरोधात अभाविपचे स्वाक्षरी मोहिम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • दाते महाविद्यालयातील विद्यार्थी व्यक्त केला रोष  तोडगा काढण्याची मागणी.  

यवतमाळ: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल 60 पेक्षा जास्त दिवस होऊनही अजून पर्यंत जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारा विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यवतमाळ शाखे तर्फे मंगळवारी (ता.23) ला येथील दाते महाविद्यालयासमोर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.  या स्वाक्षरी मोहिमेत दाते महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी मोठ्यासंख्याने स्वाक्षरी करून  विद्यापीठा विरोधातील आपला रोष व्यक्त केला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत होणार्‍या परीक्षा मे महिन्यात संपल्या. 

परीक्षा संपून साठ ते सत्तर दिवस होऊन ही परीक्षांचे निकाल मात्र अद्यापही विद्यापीठांनी जाहीर केला नाही. त्यामुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विलंब होतो आहे. अमरावती विद्यापीठ वगळता इतर विद्यापीठातील शिक्षणासाठीचे प्रवेश कालावधी निघून जात असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणीक नुकसानाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार विद्यापीठ राहील. त्यामुळे याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यवतमाळ शाखेने स्वाक्षरी मोहिम राबवली आहे.

 विद्यापीठाने परीक्षांचे प्रलंबित निकाल लवकरात लवकर घोषित करावे, विद्यापीठाने आपला भोंगळ कारभार थांबवावा, अशी मागणी संदर्भात अभाविपने ही स्वाक्षरी मोहिम राबविले. या स्वाक्षरी मोहिमेत स्थानिक दाते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून आपला रोष व्यक्त केला व या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्या अशी सुध्दा यावेळी मागणी करण्यात आली. अभाविपने घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेत केलेले बोर्ड हा  विद्यापीठाकडे पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेत अभाविप नगर महाविद्यालय प्रमुख अक्षय अस्वार, भक्ती जोशी, कौस्तुभ मोहदरकर,  गौरी काठाळे, यश ढोंगे, पियुष पंचबुद्धे, स्वप्नील राठोड, योगेश गवळी, योगेश तरोने, साक्षी लढी, हितेश केळकर, राहुल नेवारे, गौरव सोयाम, आदी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थी सहभागी होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News