आपल्या यशाचा मार्ग आपणच तयार करत असतो; Y C मध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार

मेघना जाधव, सातारा
Sunday, 18 August 2019

सर्वत्र Y C ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे 'गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात' प्रमुख पाहुणे मा. पी. एन. पाब्रेकर (माजी प्राचार्य आणि सल्लागार राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान RUSA महाराष्ट्र राज्य) यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना वरील उद्गार काढले.

मा.राजशेखर उपत्तुरी (को - फाऊंडर ऑफ थिंक 3D) यांनी "जर तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात कार्य केले, तर तुम्ही थकणार नाही." या शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. डॉ. अनिल पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. 

अध्यक्षीय भाषणात अनिल पाटील यांनी 'जो लढेल तोच टिकेल' असा कानमंत्र दिला. यानंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दहिवडी कॉलेजचे प्राचार्य बी टी. जाधव सर तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी विदयार्थी व पालक यांच्या उपस्थितीत प्रस्तुत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनिषा पाटील यांनी केले. प्रा.पी. व्ही. चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News